Friday, March 14, 2008

किती दिवस झाले माहितेय तुला..

किती दिवस झाले माहितेय तुला..
तू मला "आय लव यू" बोललासुद्धा नाहीस

किती दिवस झाले माहितेय तुला..
तू खट्याळपणे लाडात आलासुद्धा नाहीस

किती दिवस झाले माहितेय तुला..
छान दिसतेस ग .. म्हणत रूपावर माझ्या भाळलासुद्धा नाहीस

किती दिवस झाले माहितेय तुला..
थकलीस का ग .. म्हणून डोक्यावरून हात फिरवलासुद्धा नाहीस

किती दिवस झाले माहितेय तुला..
हातात घेऊन हात चार पावलं माझ्या सोबत चाललासुद्धा नाहीस

किती दिवस झाले माहितेय तुला..
किती छान ग झालय जेवण.. म्हणत तृप्तीने ढेकरलासुद्धा नाहीस

किती दिवस झाले माहितेय तुला..
मिठीत शिरूनही.. श्वासात श्वास मिसळून मोहरलासुद्धा नाहीस

.
.

रोज नवं क्षितीज काबीज करतोस राजा..!
कर.. तुझी झेपच आहे मोठी.. !
आणि.. पंखात बळही आहे तुझ्या उडण्याचे..!!
पण..
जमिनीवर मी एकटी वाट पहातेय घरट्यात..!
विसरू नकोस हं मला..!
मी ही तुझ्या पंखातलं अदृश्य बळच आहे ना रे..!!!..

2 comments:

RAJENDRA said...

Hi

You are great . I donot know from where you get these ideas and words . All are really meaningful and facts . I read your first poem and could not stop reading and ended up reading all of them . To tell you frankly I read so much after long long time . Keep it up and keep writing ., You have one more fan now ---- Rajendra

Shivaji said...

Excellent poem !!!
Last stanza is a GEM....

Shivaji USA