Sunday, March 30, 2008

तारे जमीं पर..

मुलाच्या करीअरसाठी
हल्ली पैसा फ़ेक आहे
कारण अगदी सोप्पं असं
हम दो -हमारा एक आहे

सार्‍या आमच्या महत्वाकांक्षा
त्या इवल्या पंखाना बांधल्यात
आणि उड म्हणे तू पिल्ला
आकाशात चांदण्या टांगल्यात

आमच्या डोळ्यातला तारा तू
मग आकाशातही चमकायलाच हवास
पण तारा होऊनही भागणार नाही
सूर्य म्हणून तू तळपायला हवास

तुझ्याचसाठी बघ रचले
तुझ्या करीअरचे कितिक प्लान्स
मेच्युयर होतील एवढ्यातच
तुझ्यासाठी घेतलेले चिल्ड्रन प्लान्स

मागशील ते देऊ.. सांगशील ते करु
पण बरं का तुला जिंकायलाच हवय
त्यासाठीचं तर आमचं आयुष्यं असं
चोविस तास दावणीला बांधल गेलंय
.
.
अरे थांबा रे कद्रु पालनकर्तेहो
घडवताहेत आकाशातला सूर्य तळपणारा
कुणीतरी घडवा ना रे पिल्लाला आपल्या
एक माणुस.. माणुसकी जपणारा
.
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

4 comments:

sanjaypethe said...

Pratyek shalet, praveshdwaratach mothhi karun lavali pahije hi kavita.
Por mhanje Dhor navhet, hakalayala
hey kalayalach hav pratyek janmdatyala .................
aani hech sanskar mag mulannahi udyukt kartil, aaplya janmdatyanchi kadar karayala .......................

Prof. Suresh Khedkar said...

अतिशय सुंदर कविता. अभिनंदन

प्रा.सुरेश खेडकर, नागपूर

तुमचा आनंद said...

अतिशय सुंदर कविता.
मनापासुन आवड्या आपुनको...
मी तरी माझ्या मुलांना जसे त्यांना आवडेल तसे जगायला शिकवेन..
थोड्या काहि प्रमाणात नियंत्रण ठेवुन... ;)

madhura said...

Far chhan kavita aahe. Ekadam realistic. Jeva jeva apan apalya pilla kadun kahitari apeksha karu lagato teva teva vachanya sarakhi. vachun bhanavar yenya sarakhi.