.
आईची ओळख पटण्याआधीच
पाळणा घरात... मी गेलो होतो..
समजच नव्हती त्या वयात..
त्यालाच आपलं घर समजलो होतो..
रात्री कधी तरी फार फार उशीरा
ते एका घरात मला न्यायचे..
माझ्या निरर्थक प्रश्नाना.. दमलेले ते दोघे
मोठ्या कष्टानेच उत्तर द्यायचे
फारच मी बडबडत राहिलो ..
तर टिव्ही ऑन व्ह्यायचा
खेळणी.. नाहीतर व्हिडिओ गेम एखादा
हातात कोंबला जायचा..
माझ्या अभ्यासाला सतरा ट्युशन्स
मला मिळालं फार उच्च शिक्षण
दिवाळी दसर्याला महागडे कपडे
रोजच्याला मात्र पाळणा घरचं जेवण
एखादा रविवार कधी असा यायचा
तो दिवस मला फार फार कमी पडायचा..
त्या दिवशी आई चक्क लाड करायची आणि
"बाबा"नावाचा माणूस तर चक्क हसायचा
त्या नकळत्या वयात पडले खूप प्रश्न
उत्तरं कदाचित त्याची आजही मिळालेलीच नाहीत
संपलं ते हरवलेलं बालपण माझं पाळणाघरातलं
आताशा वाटतं ती वर्षं आयुष्याची जणु मी जगलेलीच नाहीत..
मी आज अशा एका वळणावर
की तोच खुपणारा प्रश्न नव्या रूपात उभा ठाकलाय
माझा मुलगाही तीन महिन्यांचा फक्त..
आत्ताच कुठे आपल्या आईला ओळखायला लागलाय
.
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर
Saturday, April 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
वा छान. जराशी अतिशयोक्त? पण अशक्य मुळीच नाही अशी नव्या पिढीची व्यथा मलाही जाणवली. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेत ही कविता वाचून दाखवण्याला तुमची हरकत नाही ना?
" Palnaghar " apratim !!!!!!!!!!!!!!!!!!
radavalas tu mala aaj hya kavitene..............
kalajala bhidali ti kavita................
Palanaghar aso, kinwa Vruddhashram aso................
Kondwade aahet te....
aapal jagan susahy / sukhdayak vjhav mhanun, Vartamanani nivadaleli ek kondat Adagal..... !
Gr8 Sakhe, Gr8 !
Nice 1
Post a Comment