Saturday, April 19, 2008

आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात..
तू मात्र डोळ्याला डोळाही देत नाहीस
असं रे काय.. निघता निघता..
साध्या आशीर्वादालाही वाकत नाहीस
.
का आशीर्वादाच्या हक्कापासूनही आम्हाला तू तोडलंस
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

नव्हतं पटतं मान्य..
कदाचित आमचंही काही चुकलं असेल
आमची लूडबूड.. अधे मधे करणं..
तुम्हालाही कधी खटकलं असेल
.
म्हणून का रे अडगळीसारखं घराबाहेर फेकलंस..
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

सवंगडी सखे सोबती.. इथे
आम्हाला भरभरून म्हणे मिळतील
गप्पागोष्टी .. नी थट्टा मस्करीत
आमचे दिवस भरभर म्हणे पळतील..
.
पण नातवाशी खेळायचं होतं.. ते स्वप्न का मोडलंस...
वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..

वेळ भरभर जाणार..
हो.. म्हणजे शॉर्टकटने मृत्यूला गाठायच..
चार पावलावर उभा आहेच तो
नाहीतरी आता कोणासाठी आहे साठायचं..
.
भळभळत्या जखमेला कसं अचूक वेळी छेडलंस..
.
वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
आयुष्याच्या मावळतीला ....
आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन तू सोडलंस..
.
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments:

sanjaypethe said...

वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
anek vrudhhanchya manatali halhal tumhi aaj tumachya shabdatun jivant kelit...
Prabhakar Phadnis hyanchyasarkhe tumache kahi vachak, tyanchya Sobati hya sansthet, kadachit hyach jahir vachanahi karatil.. pan..
Pan, Kavitetalya tya mulacha kinwa mulicha drushtikon vegala asu shakel na? Kadachit Tyanchi mat hya Vrudhhanchya vyathepeksha bhinn asatil na?
*
aata mala tumachyakadun, Ekhadi kavita Mulanchya drushtikonatun, mhanje Vruddhanbaddal Tyanch mat mandanari, kavita apekshit aahe...........

shrikrishna samant said...

हो! प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात.म्हणून श्री.संजय पेठे यांची comment वाचून मला "वृद्धांच्या व्यथेपेक्षा भिन्न व्यथा-मुलांची,मुलगा किंवा मुलगी- कशी असू शकते ह्याची कल्पना येवून ह्याच कवितेचा सुंदर गाभा तसाच ठेवून ती भिन्न व्यथा लिहावी असं मला वाटलं.
गम्मत अशी की ती परम पूज्य माऊली दोन्ही प्रसंगात बिचारी अश्रू ढाळण्यापलिकडे काही करू शकत नाही."लळा जिव्हाळा शब्द्च खोटे"असंच तिचे अश्रू सांगत नसतील ना?
दोघांचे धन्यवाद
माझे ह्या कवितेचे "किंचीत विडंबन"
"कृष्ण उवाच" मधे वाचावे.
ही पण कविता "सोबत" मधे वाचली जावी अशी इच्छा.
सामंत

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

कृष्ण उवाच" मधे आपली कविता वाचली.. मूळ कवितेचा आणि कवयित्रीचा उल्लेख नाही ते पाहुन खेद वाटला.. बाकी कवितेबाबत .. no comments..!