| कुठे आहे निखळ सुख |
| कुठे शोधावं त्याचं कारण |
| नक्की कुठल्या दु:खाला |
| ठेवावं त्यासाठी तारण |
| कुठल्या आनंदाचं बांधावं |
| पापणीच्या दारी तोरण |
| नक्की कुठल्या भावनेचं |
| थांबवायला हवं मरण |
| कुठल्या देवादिकांना जावं |
| त्या सुखासाठी शरण |
| कसं आणि कशाने घालावं |
| वाहत्या आसवाला धरण |
| कुठल्या रातीच्या स्वप्नांला |
| वास्तवात मागावं आंदण |
| कुठल्या आशा अपेक्षेचं |
| नयनी रेखाटावं कोंदण |
| कुठेतरी ते नक्कीच आहे |
| कुठल्यातरी फुलांत, बागडणा-या मुलांत |
| कुणाच्यातरी जगण्यात, कुणाच्यातरी मानण्यात |
| आहे ते आहे… |
| सुख कुठेतरी जवळपास.. नक्कीच आहे सुख कुठेतरी जवळपास.. अनुराधा म्हापणकर |
Tuesday, July 24, 2012
सुखाच्या शोधात
उध्वस्त !
.
उध्वस्त मन..
युद्धात बेचिराख झालेल्या शहरासारखे
मनात सर्वभर भग्नावशेष..
जळून गेलेल्या काळ्याकुट्ट घरांसारखे
एकदोन अस्वस्थ विचार रांगणारे
बेचिराख शहरात वाचलेल्या एकदोघांनी
उठण्यासाठी धडपडावं असे
.
.
ते एकदोन विचार आता जगवायला हवे
बेचिराख शहरातल्या माणसांना
उठवायला हात द्यावा तसे
ते बेचिराख शहर ....
पुन्हा वसवायला हवंच ना !!
.
अनुराधा म्हापणकर
उध्वस्त मन..
युद्धात बेचिराख झालेल्या शहरासारखे
मनात सर्वभर भग्नावशेष..
जळून गेलेल्या काळ्याकुट्ट घरांसारखे
एकदोन अस्वस्थ विचार रांगणारे
बेचिराख शहरात वाचलेल्या एकदोघांनी
उठण्यासाठी धडपडावं असे
.
.
ते एकदोन विचार आता जगवायला हवे
बेचिराख शहरातल्या माणसांना
उठवायला हात द्यावा तसे
ते बेचिराख शहर ....
पुन्हा वसवायला हवंच ना !!
.
अनुराधा म्हापणकर
Subscribe to:
Comments (Atom)