| हल्ली शब्द रुसलेले असतात |
| माझ्याशी फारसे बोलत नाहीत |
| समजतात काय स्वत:ला, म्हणत |
| एकदा मुसक्या बांधूनच आणलं |
| आणि एका ओळीत नेऊन ठेवलं |
| अगदी माझ्या समोरच बसवलं .. |
| पण ते अति शहाणे.. |
| म्हणाले, कस्सं फसवलं.. |
| मारुन मुटकून आणलंस तरी |
| आम्ही बोलणार नाही |
| कवितेत तुझ्या मुळी म्हणजे |
| मुळीच फुलणार नाही |
| काय करु तेव्हा पासून मी |
| शब्दांना शोधत फिरत असते |
| भेटले तर त्यांना नक्की सांगा |
त्यांच्यासाठी मी झुरत असते
|
Wednesday, November 7, 2012
रुसलेले शब्द..
Subscribe to:
Comments (Atom)