Thursday, June 12, 2008

लाइफ़ इज ब्युटीफुल

लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे
कारण..
मला तुझी..
तुला माझी..
सोबत.. अष्टौ प्रहर आहे..

कधी व्यक्त..
कधी अव्यक्त..
भावनांचा आवेग
प्रेमाचा फुलला बहर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

सुखात हसताना
एकमेकांत रमताना
ओठांवर तुझ्या
माझ्या आनंदाची लहर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

अडथळ्यांची शर्यत
दु:खाचे उंच डोंगर
तुझे अश्रु पुसायला
रेशमी माझा पदर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

ऊन.. कधी पाऊस
कधी बोचरी थंडी
तुला लपेटणारी
माझ्या ऊबेची चादर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे..!!
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

2 comments:

  1. Awesome simply grt....

    LIFE IS BEAUTIFUL....really...
    Tujhyaa baryaach kavitaa aavadalya...sagalaa blogahi aavadalaa..mi sandip surale mahit asel kadaachit tulaa...

    डायरीच्या पानावर माझी आत्मकथा उरून गेली.. hi kavitaahi atishay maarmik aahe...Grt Compositions!

    ReplyDelete
  2. लाइफ़ इज ब्युटीफुल
    हे जीवन सुंदर आहे
    कारण..
    मला तुझी.. ( पुरुषाची )
    तुला माझी.. ( स्त्रीची )
    .
    हे खर आहे, खरच आहे., पण....
    जसा अश्रु पुसायला रेशमी पदर असतो,
    तसाच अश्रु ढालायाला, एक विश्वासाचा मजबूत खांदा सुद्धा असतो.......
    .
    सुख-दु:खात एकाच दोरिवरून एकत्र चालत रहायच,
    असच दोन जीवांच एकमेकांवर नितांत प्रेम असत, म्हणुनच
    तरच हे जीवन सुंदर होत ..... Life becomes more Beautiful !!!!!!!
    ----------------
    अप्रतिम !!!!
    माझ्या मनातली कविता वाटली ..............

    ReplyDelete