
उन्हे उलटता, सांजवेळी
श्रावण ओल्या घनात ग
दाटून आले आभाळ सारे
पावसाच्या काय मनात ग
रिमझिम रिमझिम झिरमिरती
इवलेइवले तुषार ग
हळूच मागून खोडी काढी
वारा किती हुशार ग
उघडीप झाली मेघाआडूनी
तळ्यात चमचम बिंब ग
तिरिप कोवळी पिवळीपिवळी
पानांत टपटप थेंब ग
श्रावण सा-या चराचरांत
नवचैतन्याचा पूर ग
अलगद जैसे मनात कोणी
छेडत राही सूर ग
: अनुराधा म्हापणकर
व्वा सुररेख!
ReplyDeleteभा. रा तांबेंची "पिवळे तांबूस उन कोवळे" आठवली.