ज्यावर माझी ही अचेतन काया..
हे अंथरूण आहे की मृत्यु शय्या..?
की मला पांघरलेल्या चादरीतच
अडकलाय माझ्या कुडीतला प्राण
न जाणो किती वर्ष सरली इथेच
हा शय्येवर खिळलेला देह निष्प्राण
अर्ध्या देहाची जळून गेली संवेदना
आणि जळत्या मनाच्या असह्य वेदना
त्या खिडकीच्या छोट्या चौकटीतून
बाहेर दिसणारं ते तुकडाभर आभाळ
तिथेच डोळे लावून बसतो मी रोज
कोण जाणे असच, अजून किती काळ
करणारे सेवा करतात.. मेला जीव जगवतात..
माझा जीव जगवताना स्वत:चा जीव मारतात
पण हे न येणारं मरण आता नाही सोसवत..
लेकाचं हे तीळ तीळ मरणं आता नाही बघवत
पुरे झालं रे श्रावण बाळा.. पितृ ऋण सारं फेडलस
इतकी केलीस सेवा ..की बापालाच ऋणात ओढलस
.
.
एकच दान मागतो.. माझं अखेरचं मागणं..
देता आलं तर देऊन जा- इच्छा मरणाचं देणं..
:
:
: सौ. अनुराधा म्हापणकर
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
kavita vachun, Ashru dhalanyapalikade dusar kahich vyakt hota yet nahi............
ReplyDeletesagal jeevanach dhavalun nighal, hya eka kavitene......
itaki Pragalbh kavita? ..... ?
ha anubhav dahak asto....
pan shravanbaal vhayalahi bhagy lagat.....
त्या आर्त स्वरांची,
ReplyDeleteजी हांक ऐकलेली
उर्मी उरातली ती
भरभरून मनि आली
कळ अंतरी कळाली
कविता इथे अवतरली
sagalyaach kavitaa chhaan aahet.ek vaachali ki poodhachyaa vaachlyaashivay rahaavat naahi an manaavaroon tyaanchi jaadoo ootarat naahi.
ReplyDeleteडोळ्यात पाणी आलं, हि वेदना खूप समर्थपणे मांडली आहेस. तुझा कौतुक करायला शब्द नाहीत माझ्या कडे...
ReplyDeleteडोळ्यात पाणी आलं, हि वेदना खूप समर्थपणे मांडली आहेस. तुझा कौतुक करायला शब्द नाहीत माझ्या कडे...
ReplyDelete