शब्द आहे श्वास माझा
शब्द हेच विश्व आहे
शब्दसुसाट वेगान पळणारं
उधळलेलं एक अश्व आहे
शब्द माझा प्राण वायू
हवेतला जणू ओक्सिजन आहे
शब्द हेच एकमेव
जगण्याचे प्रयोजन आहे..
शब्द माझ्या हृदयातील
धड़धड़णारं स्पंदन आहे
हसवणारं कधी पोट धरून
करुण कधी आक्रन्दन आहे
शब्द माझे भावनाना
फुलवणारा गाव आहे
रोजचेच सारे तरी
अव्यक्त असा भाव आहे
शब्द माझे लढवय्ये
वेशीबाहेर त्यांची धाव आहे
गाठले शिखर कधी
कधीतरी बुडालेली नाव आहे
शब्द माझे शिवधनुष्य
मी पेललेला भार आहे
भेद्लेला डोळा कधी तर
तलवारीचा वार आहे
शब्दावाचून जगावा असा
एक क्षणही व्यर्थ आहे
स्वप्नातही शब्द माझ्या
म्हणून झोपेलाही अर्थ आहे
शब्द सुमनांची माझ्याकडे
नित्य भरलेली झोळी आहे
दरवळणारा सुवास त्याचा
न कोमेजणारी पाकळी आहे
शब्दांचा दरवळ माझ्या
लपता आता लपतच नाही
प्रदर्शनी ना मांडला परी
वा-यासवे तो वाहातच राही
शब्दांची माझ्या दौलत..
कमवण्यासारख सुख नाही
उधळले जरी असंख्य तरी
गमावल्याचेही दु:ख नाही
Tuesday, November 27, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
अनुराधा, सुंदर आहेत कविता. तो येणार आहे परत तर अंतरंग हलवून गेली . शब्द या विषयावर माझी ही एक कविता आहे. ब्लॉगचं नाव झुळुक.
ReplyDeletebest plz send my mail what new
ReplyDeleteraju_patil9999@rediffmail.com