Tuesday, March 18, 2008

बायपास

डबडबलेला घाम.. छातीतली धडधड
श्वासासाठी चालली दोन मिनिटांची धडपड

डोळे उघडले तेव्हा नाकात खुपसलेला प्राणवायु
आणि समोरच्या काचेवर लिहिलं होतं आय सी यु

काचेपलिकडून डोकावणारे अनेक धीर गंभीर डोळे
त्यातच दोन बायकोचेही पण त्या सर्वांपेक्षा वेगळे

डॉक्टर आणि नर्सेस सार्‍यांची उडालीये तारांबळ
बहुतेक मला जगवण्यासाठीच चाललीये ही धावपळ

मॅसीव होता झटका तरी आता स्टेबल आहे म्हणतात
कोण जाणे कशासाठी मग पळापळ एवढी करतात

एन्जोग्राफीत म्हणे सापडलेत तीन तीन ब्लॉक्स पक्के
परीक्षेत नाही जमले पण इथे सगळ्यात नव्वद टक्के

आता फक्त बायपास.. त्याशिवाय नाहीच उरला उपाय
जीवंत मला रहायचं असेल तर एवढा एकच आहे पर्याय

आज माझी बायपास.. बायकोला म्हटलं नको करून घेऊ त्रास
हां आलोच मी थोड्या वेळात, वाटेतल्या मृत्युला करून बायपास..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments:

  1. आपल्या शब्दांचे अंतरंग माझ्या मनाला भावलेत

    ReplyDelete
  2. वा! बायपास सारख्या विषयावरहि छान कविता लिहिता येते तर! अभिनंदन. माझेहि ब्लॉग आहेत पण मी कविता करत नाही! जमल्यास पहा.

    ReplyDelete