फ़ॉर्वर्डेड एसएमएस नका पाठवू मला..
नको ती इमेल्स सेँड टू ऑल केलेली
एखादी सुद्धा चालेल खुषालीची ओळ
पण माझ्याचसाठी असावी लिहिलेली
निमित्त कसलेही नसताना बोलायला
कधी करा फोन सहजच एका संध्याकाळी
कामासाठी फक्त नका आठवू मला
मिस्डकॉल तर नकोच कधीही आडवेळी
दोन ओळीचे सुद्धा चालेल पत्र
दोन दिवसांनी क्षेम- कुशल सांगणारे
स्पर्श ज्याला असतो आपल्या माणसाचा
त्या हळव्या भावना अलगद पाझरणारे
प्रेम करा थोडसंच.. चालेल..!
पण नाटकी नी बेगडी नको..
आतड्यातून करा माया..
इंटर नेटच्या जाळ्यातून नको..
:
:
सौ. अनुराधा म्हापणकर
Friday, March 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
अनुराधा ताई, कठोर सत्य तुम्ही हळुवार शब्दात मांड्लय...!! पण आता सगंळ जगच vairtual ( याला मराठीत काय म्हणतात ) झालयं..रोज सकळी ते "good morning चे mail " वाचुन कंटाळा येतो..!!
ReplyDeleteआवडली कविता आणि पटली सुद्धा. मला सुद्धा फॉरवर्ड केलेल्या आणि सगळ्यांसाठी पाठवलेल्या ईमेलसचा वैताग येतो. पाठवणार्याला बरेचवेळा माहीत पण नसते तो कोणाला पाठवत आहे ते. भावना छान मांडल्यात.
ReplyDeleteअरे वा ! अगदी काळाला अनुकुल अशी कविता.
ReplyDeleteपण खरच आपण किती माणुसघाणॆ होत चाललो आहोत, माणासांमधला निख्खळ संवाद हि कठीण होत चालला आहे या साऱ्या सुखसोयीं मुळे.
तुमची ही कविता पण छान आहे.
ReplyDelete