फुले पाने चंद्र चांदण्या
समुद्र नद्या झरे वारे..
माझ्या कवितेच्या विश्वात
एकदा तरी डोकवून जा रे..!
माझ्या शब्दांशी का बरं
जुळत नाही तुमची सोयरीक
का कधी त्यांच्याकडूनच
घडली आहे अक्षम्य आगळीक
तुम्हाला सोबतीला घेऊन
कविता सर्वांच्या कशा खास
तुमच्या विना माझे शब्द
कसे निरस.. आणि भकास
तुमची वाट पाहून मग मी
माणसा माणसांतच कविता पहाते
जीवन सारच सारे जमवून
कवितेतून माझ्या वहाते
तरीही
आजही माझी कविता बिच्चारी
तुमची वाट पहात आहे
कधीतरी तुम्ही येणार..
वेड्या आशेवर रहात आहे
सौ. अनुराधा म्हापणकर
Wednesday, April 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
अप्रतीम कवीता. नेहमी प्रमाणॆच
ReplyDeleteकशाला हव्यास या
ReplyDeleteउगवणा-या
मावळणा-या
अशाश्वताचा...?
तुला शोध लागलाय
माणसातल्या
शाश्वताचा..!!
डोळ्यातला डोह..त्यातले खळाळणारे पाणी
मनाचा मोह....त्यात चंद्र-सुर्यांची गाणी..!!!
देहाचे वाळणारे पान
आणि कलांनी शापित
..................चांदगान !
कशाला ग हव्यास......
आम्हीच बिचारे
या कुंपणात अडकलोय
पार्थिवाच्या बेड्यांत अडकलोय
मला देतेस काही आंदण...
तुझ्या ओटीतलं दान..?
मी पण आता तसच जगावं म्हणतोय.........
आभाळाचे पंख घेउन
मॄत्तिकेच्या देहातुन......!!
Manasa manasat kavia pahatana .......... (?)
ReplyDelete