Friday, April 4, 2008

वटपौर्णिमा..

या वर्षीही मी वटपौर्णिमा करणार आहे
दरवर्षीप्रमाणे उपवाससुद्धा धरणार आहे
वडाला नित्यासारखे फेरेही घालणार आहे
जन्मोजन्मी तुलाच देवाकडे मागणार आहे
.
पण यंदा देवाला काही अट घालणार आहे
अट घालूनच मग मी वट पूजणार आहे

नाही रे तसं नाही .. तू नाही झालेलास मला वर्ज्य
थोडा हवाय बदल फक्त म्हणून करणार आहे अर्ज

सांगेन -येणारे सारे जन्म मला, तुझा नवरा होता यावे
आणि बायको म्हणून किनई तुझे, माझ्याशी लग्न ह्वावे

तुला मग माझी नवरेशाही मस्त दाखवीन म्हणते
या जन्मीचा सारा हिशोब चोख चुकता करीन म्हणते

वट पूजशील ना जेव्हा तू.. माझा शब्द तुला स्मरेल
बायको होणं सोप्पं नसतं बरं ..तुला तेव्हाच ते कळेल..!
.
.
टिपिकल बायको..!
सौ. अनुराधा म्हापणकर

2 comments:

  1. वा झकास. पण बायको झालेल्या (या जन्मीच्या) नवऱ्याने वट पुजलाच नाही तर? सगळाच बेत फिसकटेल ना!

    ReplyDelete
  2. mast! pan, pudhchya janmi, bayakone parat aat ghatali tar, punha....

    ReplyDelete