वर्षं संपलं .. तशी डायरीही संपली..
थर्टी फ़र्स्ट नाइट ला हलकेच तिला मिटली..
अशा कित्येक डायर्या.. आणि कित्येक वर्षं सरली..
त्या सरल्या फाटक्या पानांवर सरसर नजर फिरली..
मी तर कदाचित आत्म चरित्रच लिहिले होते..
नेहमी एकाच चष्म्यातून जगाकडे पाहिले होते..
आजवर मी कध्धी कध्धीच चुकले नव्हते..
माझ्या तत्वांना कध्धीच मी विकले नव्हते..
सार्यांनीच माझ्यावर केलेला अन्याय होता..
मी मात्र प्रत्येक वेळेस केला तो न्याय होता..
यश मिळाले जे त्यावर माझा अधिकार होता..
अपयश जे वाट्याला आले तो दैवाचा वार होता..
खूप दु:ख केवळ माझ्याच पदरात आले
सुख फारच थोडे हुलकावणी देऊन गेले..
कष्ट.. संघर्ष करून मी जरा कुठे स्थिरावले..
जगायला तेव्हा कुठे मी थोडी थोडी सरावले..
अस्सा गेला एकेक दिवस- महिने..वर्षं सरून गेली..
डायरीच्या पानावर माझी आत्मकथा उरून गेली..
:सौ. अनुराधा म्हापणकर.
Tuesday, April 29, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment