प्रहार : कोलाज : २८ फेब्रुवारी, २०१०
http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=20167&boxid=23442593
ही कातरवेळ,पाहून धरेचा तो आवेश
जीवा लागे हूरहूर
दाटते दाहिदिशा
एक काहूर काहूर
आज अवसेची रात
चांदण्यांची साथ नाही
तुझ्यासवे साजरी
अशी एक रात नाही
बाहुपाशातून का रे
झाले अशी मी दूर
पाखरांचेही लोपले रे
ते गोड गोड सूर
झाडांपानांतून इशारे
मेघांनी अडवेन मी वाट
बघ धरला हात तुझा
सागराची होऊन मी लाट
नको नको ग अडवू वाटजाताजाता अलगद त्याने
नको मोडूस माझी वहिवाट
निज तूही रात प्रहर
हा आलोच मी, होताच पहाट
तिमिराला भितो मी
वाढला तो -जातो मी
समुद्रस्नान घेतो मी
भल्या पहाटे येतो मी
आज नाही चांदणी
पहा सोबत माझी संधीप्रभा
नसेन जरी समीप तुझ्या
असेल परी माझी आभा
ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हां चाळा होता
ह्या प्रश्नाचं उत्तर
येणार नाही तरीही
स्क्रैपची दखल कोणी
घेणार नाही तरीही
लिहायचं अन् पुसायचं, ऑरकुटचा तो फळा होता
ऑनलाइन आहेस?.... प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
दिसायची होमपेजवर
पुन्हा पुन्हा ती नावे
उत्तर द्यायची पद्धत
नसावी त्यांच्या गावेमाझ्या उत्कंठेचा तरी स्टँमिनाच निराळा होता
ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
माझ्याही फळ्यावर काही
अनुत्तरीत प्रश्न थकले
कितीदा तरी स्वहस्तेच
पुसून ते मी टाकले
दोष देण्याचा अधिकार म्हणून मला विरळा होता
ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
अंगवळणी पडली रीत
हे जगच आहे व्हर्च्युअल
बोलाचीच नाती सारी
काहीच नसते एक्च्युअल
साक्षात्कार माझा मला झाला किती वेळा होता
तरी.. ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
| थेंब अश्रुंचे गालावरती पुसायाचे राहून गेले.. |
| लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. |
| . |
| सांगितले बरेच काही..आनंदाश्रु अन काही बाही.. |
| अर्थ सुकल्या आसवाचा, परी लावायचा तो लावून गेले.. |
| . |
| लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. |
| पुसले डोळे, हसून खोटे, चाचपले मी किती मुखवटे |
| मुखवट्याला चेहर्यावरती परी चढवायचे राहून गेले |
| . |
| लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. |
| हसून आता, विसरून सारे, वावरते जणू उनाड वारे |
| हसता हसता भरले डोळे, पापणीतूनी अश्रू वाहून गेले |
| . |
| लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. |
| . |
| थेंब अश्रुंचे गालावरती पुसायाचे राहून गेले.. |
| लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. |