Tuesday, December 23, 2008

शिट्टी.....!

.
धगधगतय.. की..
काहीतरी उकडतंय आत..?
कोंडलेली वाफ.. तप्त ज्वाळा
सोसवेना झाल्या ह्या उष्ण झळा
उकळतंय की शिजतंय रटारट
असह्य होतेय आता ही घुसमट
कसं आणि कुठून बाहेर पडावं
की उठावं आणि फुटून यावं..

"शिट्टी" वाजली..
गैस मालवला..
"कूकर" उतरला..
शांत झालं सारं..!!

धगधगत्या.. वाफाळत्या
तापल्या .. कोंडल्या..
घुसमटत्या मनाची मात्र
अजिबात "शिट्टी" होत नाही..
त्याला काय करावं..?
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

2 comments:

  1. हाय!खूपच छान!अगदी मोजक्या ओळीत स्त्रीच्या मनोवस्थेचं सार मार्मिकपणे मांडलत!"त्याला काय करावं?" हा खराच मोठा प्रश्नं आहे!

    ReplyDelete