Thursday, September 9, 2010

बाप्पा म्हणाला, आठव टिळक
म्हटलं, गुगलवर बघू,
पटते का ओळख..

बाप्पाने मागितला, इकोफ्रेन्डली मखर
समजावत म्हटलं.. फॆड आहे रे सगळं
थर्माकोलच वापर

बाप्पाला हवी, शाडूची मूर्ती
छे छे.. म्हटलं, काहीतरीच !
अरे, नाजूक फार ती..

बाप्पाने म्हटलं, नको बॆन्डबाजा
मागवलाय म्हटलं त्याला
नाशिकचा ढोल ताशा

बाप्पा म्हणे, वीज जाळू नको फार
कशाला रे काळजी म्हटलं
जनरेटर्सही आहेत चार

बाप्पा वैतागला, लाऊडस्पीकर नको
आरतीचंच असेल रे रिमीक्स
अज्जिबात फिकर नको

बाप्पा म्हणाला उकडीचा मोदक हवा
म्हटलं, अरे चाखून पाहिलाय..
कालचाच आहे खवा

नवसाला पाव रे म्हणत,
त्याच्यावर नारळांचं तोरण चढवलं
पळ काढत म्हणाला बाप्पा
प्लॆस्टरच्या मूर्तीत माझं देवपणच हरवलं


: अनुराधा म्हापणकर

4 comments:

  1. अप्रतिम.. खूप सुरेख..

    ReplyDelete
  2. छान आहे कविता! महत्त्वाचा प्रश्न मांडलाय - देव माणसाचा निर्माता की माणूस देवाचा?

    ReplyDelete
  3. Anuradha
    Khupach Chaan,Apratim.
    Keep it up.

    ReplyDelete
  4. ही वास्तवता आहे हे खरे. कविता पटली.

    ReplyDelete