Saturday, May 11, 2013

सांग ना - काय हवं ?


उगवती शुक्राची चांदणी देशील की
अढळ ध्रुवतारा..
कवेत घेऊन येशील का माझ्यासाठी
तो बेभान उनाड वारा

कातरवेळंच दाटलेलं क्षितीज
आणून देशील
चांदणरातीचं चमचमतं आभाळ
पेलून घेशील

सागरातली उसळलेली भरशील का
ओंजळीत एक लाट
की हिरव्या शेतातली आणून देशील
नागमोडी एक वाट

आणशील का ते चंद्रबिंब
पूर्ण गोल पुनवेचे
आणशील कोवळे किरण
तांबूस पिवळ्या पूर्वेचे

गवताच्या पातीवरला दवबिंदू
अलगद झेलशील ?
डोळ्यांच्याच भाषेत माझ्याशी
नजरेनं बोलशील ?

घेशील का आणाभाका
देशील का वचन
अबोल भावनेतही माझं
वाचशील का रे मन
.
भारावल्या सारखा तिच्याकडे तो
पाहात उभा राहिला
पहिल्या रात्रीच उभ्या संसाराचा
चित्रपट त्याने पाहिला
.
.
पुन्हा कधीच त्याने तिला
"काय हवं"- प्रश्न विचारला नाही
कवयित्रीशी झालं होतं लग्न
तो कधीकध्धीच विसरला नाही

- अनुराधा म्हापणकर

3 comments:

  1. खूपच सुरेख. अगदी मनाला भिडणारी कविता. माझ्या नवर्‍यालाही बहुदा असंच काहीसं वाटत असेल!
    पण असं अलवार , कागदी मन घेऊन वावरणार्‍या आपल्या सारख्या कविताच जगणार्‍यांना असं विचारण्याखेरीज पर्याय तरी कुठे आहे दुसरा....?
    शुभेच्छा; :-)
    अश्विनी

    ReplyDelete
  2. येत्या १५ ऑगस्टला नक्षत्र आहे अनुराधा, न कावता एक कविता केलीत तर २ ऑगस्टची आठवण रसिकांच्या कायम स्मरणात राहील... कपाळावरच्या तीन कुंकुंटिळकांपैकी दुसरे कोणते हा प्रश्न, मोजायची सुरुवात कुठून करायची ह्यावर अवलंबून असतो...

    (_एका_) वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे...!

    ReplyDelete
  3. हिलरी क्लिंटन भेटायला आल्या तरी त्यांच्यापुढे न वाकता केलेली "ताकवी नासा यास कविता".

    हेच ते जे ममता बॅनर्जींना देखिल जमले नाही ते...

    गुरुदेव टागोरांनी देखिल जे सांगितले नाही ते...

    आणि सुभाषचंद्र बोसांनी जे भाषण केले नाही ते...

    ReplyDelete