Saturday, March 8, 2008

महिलादिनाची पोचपावती..

बाईपणाचे आज माझ्या - कौतुक तुमचे करणे नको
कर्तृत्वाचे आज माझ्या - वजन तुम्ही तोलणे नको
भरारीची आज माझ्या - झेप तुम्ही मोजणे नको
आजपुरतेच मला तुमचे डोक्यावर घेऊन नाचणे नको

नको आहे उदो उदो माझ्या स्त्री-आत्म् शक्तीचा..
नको आहे आरक्षणाचा- राखीव नियम सक्तीचा

बाईपण माझे - ते तुमचे मला जपणे नको
अबला सबला.. चिकटवलेली विशेषणे नको

उंच उत्तुंग भरारीला माझ्या बाईपणाची शिडी नको
अमर्याद कर्तृत्वाच्या पायात बाईपणाची बेडी नको

उमलुदे फुलुदे ..नैसर्गिकच- संकरित कलमी फुलणे नको
आज खुलताना मनभरुन.. एरवीचे मन मारुन ते कुढणे नको
आज मखरात सजताना.. रोजचे अडगळीतले सडणे नको
आज मुक्त वावरताना -उद्या ते भर रस्त्यातले अडणे नको

महिलादिनी सलाम ठोकुनि वर्षभर उट्टे काढणे नको
आजच्या पुरते पाय धरून.. वर्षभर पाय ओढणे नको

पुरूष दिन केलात का साजरा कधी
मग महिलादिनाचीही महती नको
माणूस म्हणूनच जगू दे फक्त..
एकाच दिवसापुरती ही पोच पावती नको..
.
.

:मी फक्त एक माणुस..
सौ. अनुराधा म्हापणकर
:महिलादिन.मार्च ८, २००८

4 comments:

  1. अगदी बरोबर.
    तुमच्या कवितांमधुन सहजपणे व्यक्त केलेला सामाजिक आशय मनाला भिडतो.

    ReplyDelete
  2. अनुराधाताई

    अतिशय वेगळा विचार मांडणारी परखड कविता अतिशय आवडली. आपण ती मनोगत या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यास आपला संदेश जास्त लोकांपर्यंत पोचेल असे वाटते.

    विनायक

    ReplyDelete
  3. Maajhyaa manatala bollat...
    Ya eka divasaopurati mahati nako...
    Mahila ya purushachya khandyala khanda laavun jagat aahet... tyanna kubadyachi garaj nahi hech kalat nahi kunala....

    Majhya blogvar mi hi kavita takat aahe..
    Hope tumhi objection ghenar nahit.. :)

    ReplyDelete
  4. Once again Greta Mrs Anuradha . I am sure this is what whole world need to understand . Tumchi ji shabdachi nivad ani tyache kavitet mandane aahe , te apratim . Aasech lihit raha and lokana vastavatechi janeev det raha ,, well done - Rajendra

    ReplyDelete