Tuesday, April 14, 2009

संवाद

मी खूप अडवलं
मी खूप थांबवलं
कोणीही ऐकत नाही
खरतर माझं
कोणालाच पटत नाही
खूप म्हटलं..
बोलून होऊ दे नं..
नका मधे मधे बोलू..
हसले सगळे..
चल.. वेडी कुठली.. म्हणाले
असं स्वत:शीच कोणी बोलतं का?
पण बोलायचय ना मला..
माझ्या मनाशीच.. !
नका ना डिस्टर्ब करु..?
छे...!
कोणी ऐकतच नाही..
बोलतच रहातात माझ्याशी
सारखं सारखं...! मधे मधे..!
खूप दिवस झाले..
मनाशी संवादच साधला नाही..!
.
.
खरतर..
मला स्वत:चं स्वरुप नाही समजून घ्यायचं
किंवा त्याला एखादं नवं रुपही नाही द्यायचं

थोडा तुटूदे तुटला तर
बाहेरल्या जगाशी संवादही नको
कुठल्या विराट अन् प्रगल्भ..
स्वच्छंद संवादाची सादही नको

माझं मनच साद घालतय.. कधी पासून
त्यालाच आधी प्रतिसाद देईन म्हणते..!
थोडा वेळ.. थोडाच वेळ..
थोडं स्वत:शीच बोलून घेईन म्हणते..!
.
.
कुठल्याही वैचारीक गप्पा नाही
कुठला आध्यात्मिक टप्पा नाही
साचून राहिलेला एकेक कप्पा आहे
तोच मोकळा करणे आहे..
बरेच दिवस जे घेतले नाही
ते क्षेम कुशल विचारणे आहे


कधी शोधते मी एकांत निवांत..
एखादा एकाकी कोपरा.. शांत शांत
पण फार अवाजवी मागणं आहे
कळतय मला..!

कदाचित म्हणूनच कधीतरी..
असंही करुन बघणार आहे
घराखालच्या बसस्टॊपवर
उगाच बसमधे चढणार आहे
पार शेवटच्या स्टॊपच तिकिट
आणि पुन्हा परतेन तशीच

ते दोन तीन तास..!
खिडकीत बसायचं..
डोळे बंद.. कानाला इअरफोन
मोबाइल स्विच ऒफ़्फ़..!
सभोवतालच्या गर्दीतही मग
अगदी एकटी असेन मी..
पोटभर बोलेन म्हणते, स्वत:शीच..!
खूप दिवस झाले..
मनाशी संवादच साधला नाही..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

5 comments:

  1. hasun hasun potachi murkandi valalali? dhanyavaad!.
    .
    .
    .
    are you serious?
    dhanyavaad!.

    ReplyDelete
  2. उत्कृष्ट.....

    एकदम छान....
    पण असा कसा मनाशी संवाद राहिलेला साचून आहे.....
    माझे मन बोलताना मला इतर कुणाचं काही ऐकुच येत नाही.

    ReplyDelete
  3. छान व्यथा मंडळीस मनाची. पण स्वतःशी संवाद साधायला फार जास्ती वेळ मिळाला तर स्वतःशी भांडण व्हायला लागत! ती वेगळी व्यथा आहे...!

    ReplyDelete