Saturday, March 28, 2009

वायरस

काल गुढीपाडवा..
त्या निमित्ताने कालच सिस्टीमवर हात मारला होता
अपडेटेड एन्टी वायरससुद्धा सिस्टीममधे पेरला होता

नको त्या जुन्या फ़ाइल्स डिलीट करून टाकल्या
काही नव्या उघडलेल्या छान एडीट करून ठेवल्या

म्हटलं आता थोडे दिवसतरी
पीसी दणक्यात चालेल..

आज पीसी ऒन केला…
छे..!

आज हवेतच कंटाळ्याचा वायरस आहे
सगळ्ळ कस्सं नको इतकं सिरीयस आहे

ओह..!
काल फुटलेल्या कोवळ्या पालवीच्या
फाइल्स सुद्दा उडल्यात
’उत्साह’ एन्टी वायरसच्या सा-या
सिक्युरीटीज त्याने तोडल्यात

शी…!!!!
आज सिस्टीम पुन्हा मरत मरत चालतंय..!


:सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments:

 1. खुपच छान वाटली !!!!!!!!!!!!!
  आमच्या आयुष्यात सुधा असेच काहीतरी चलाये !!!!!!!!!!
  वायरस आला

  ReplyDelete
 2. हं....


  “काल फुटलेल्या कोवळ्या पालवीच्या”...... अरेरे. लवकरात लवकर इंटरनेटवर ठेवत जा हो तुमच्या पालव्या हरवू नका देऊ.

  शुभेच्छा!

  ReplyDelete