Sunday, August 2, 2009

संदर्भासहीत स्पष्टीकरण

.
शाळेच्या प्रश्नपत्रिकेत
हमखास असायचा हा प्रश्न..
धड्यातलं एखादं वाक्य
आणि त्याचा संदर्भ देत
द्यावं लागायचं स्पष्टीकरण..
..संदर्भासहीत स्पष्टीकरण!

आता
रागात.. वादात..
अस्सच निघून जातं
एखादं बेसलेस वाक्य..!

आणि मग..
शांत झाल्यावर..
थोडंसं धुम्मसताना
मी तुला आणि
तू मला द्यायचे
'त्या ' 'त्या' वाक्यांचे संदर्भ
आणि.. मागायचे..
स्पष्टीकरण..!
संदर्भासहित.. स्पष्टीकरण!

शाळा संपली.. तरी
प्रश्नपत्रिका काही सुटत नाही..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments:

  1. वा....

    काही काही वाक्यं... विनोदी प्रसंगातलेसुद्धा असेच अत्यंत आवडीचे होतात.....

    शिवाय... कोण कोणास म्हणाले.....
    माझे काका आणि बाबा गप्पा मारायला लागले की हे जाणवून येतं. मग एखद्या वाक्याचे थोडे शब्दच पुरेसे असतात भरपूर अर्थ कळवण्यात. मग हा हा ही ही खी खी ई. सुरु राहते.

    ReplyDelete
  2. खूप आवडली कविता!
    शाळा संपली.. तरी
    प्रश्नपत्रिका काही सुटत नाही..
    हे तर एक्दम खास....:)

    ReplyDelete
  3. हो अगदी खर आहे, शाला संपली तरी प्रश्न पत्रिका ही वेगवेगल्या मार्गाने आपल्या आयुष्यात येतच असते.

    ReplyDelete