Friday, August 14, 2009

हू केअर्स..!!

आज फ़ीवर आहे...
इनडीपेन्डस डे फ़ीवर..

आज लोड होतील अनेक
पेट्रिऑटिक व्हिडीओज..
प्रोफ़ाइल्सचे बदलतील कँप्शन्स..
फुटतील देशभक्तीचे धुमारे..
गाडी गाडीवर.. हातात सुद्धा
इवले इवले कागदी झेंडे
आणि..

परवा तोच तिरंगा..
असेल कुठेतरी, धूळ खात
कोपर्‍यात.. अडगळीत
किंवा... कुठेही..
अगदी कुठेही..

आणि
मनातली देशभक्तीसुद्धा
तशीच अडगळीत.. कोपर्‍यात
किंवा निद्रिस्त..

हू केअर्स..!!
शोधू ना पुन्हा तो तिरंगा
आणि नवे व्हिडीओज..
२६ जानेवारीला..!सौ. अनुराधा म्हापणकर

4 comments:

 1. मीच तो तिरंगा,
  फडकविला मजला,
  फेकूनि दिला.
  आज कचरा झाला !

  देशभक्तीचीच वानवा,
  कुठे कुठे शोधू तिजला ?
  हृदयातूनच पसार की,
  त्याचा ही कचरा झाला !!

  ReplyDelete