Monday, September 7, 2009

सायलेन्ट लेटर्स

'Know' तल्या 'K' सारखे
काही उद्गार सायलेन्ट असावेत..
'Know' मधे 'K' आहे
ते माहित असतंच ना सार्‍यांना..
पण त्याचा उच्चार 'क्नो' झाला तर ?
तो खटकतोच ना..!

तस्सच... आहे आयुष्य..!
प्रत्येक वेळी मनात येतं
ते बोलायलाच हवं.. असं नसतं..
न सांगता न बोलता
त्या सायलेन्ट 'के'चं असणं
समोरच्यालाही कळत असतं..

पण तो उच्चारला की खटकतो..!
म्हणून काही 'के' .. असेच..
मनात ठेवायचे.. ओठांत शिवायचे..(मनात आला विचार..
आणि लिहिलं काही बाही !
कवितेच्या नावावर
हे गद्य खपवणार नाही )
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

8 comments:

 1. खरं आहे. कविता नसूदे वीचार छान आहे.

  ReplyDelete
 2. मॉडर्न आर्ट सारखी - मॉडर्न कविता म्हणुनही चालली असती.... असो.. विचार पटले!

  ReplyDelete
 3. tai....kavitechya palikade lihili aahes...............patala aekdam

  ReplyDelete
 4. सायलेन्ट राहीला नाही म्हणून खटकतो
  सायलेन्ट राहीलात तरीही खटकतोच !!

  ReplyDelete
 5. खूप छान लिहीतक़ मॅडम...थांबून विचार केल्यावरच की असे मला का नाही सुचत....
  खरच हे कसे सुचते तुम्हा लेखकांना आणि कवींना...आम्हा सामन्या माणसांचे वाचन कमी म्नाणून असेल कदाचित....विजय साठे मुंबई...
  sathe_guruji@rediffmail.com

  ReplyDelete