Monday, December 14, 2009

खरं ना ??

खरं सांगू का
तसं.. फारसं कंटाळवाणं नाही आयुष्य !

तस्स रुटिन.. कामाला जुंपलेलं
तरी विकेन्डला विरंगुळा जपलेलं

एखादं हटके नाटक, सीसीडीतली कॊफ़ी
मल्टिप्लेक्समधे नुकता रीलीज्ड मूव्ही

मॊल, हॊटेलीन्ग, शॊपिन्ग्ज..
वर्षाकाठी गेट टूगेदर्स, गॆदरिन्ग्ज

झालीच तर एखादी प्लॆन्ड सहल
अगदीच नाहीतर निदान वर्षासहल

लग्न.. मुंज.. सण समारंभ
नव्या प्रोजेक्टचा झोकात आरंभ

चाललंय तस्स उत्तमच !
कुठे काही उणं धुणं.. नाहीच !

पण तरी कोणजाणॆ का … काही खुपतच !
कुठेतरी आतल्याआत.. काहीतरी दुखतच !

कदाचित सोशल खूप झालोय..!
बाहेरच्या गर्दीत मिसळून गेलोय ..!
आणि…
जीवाभावाच्या माणसांशी मात्र..
संवाद हरवून बसलोय़ !
खरं ना ??


सौ.अनुराधा म्हापणकर

4 comments:

 1. khup sunder. ek janiv nirman jhali. dhanvaad.

  ReplyDelete
 2. कविता एकदम हलकीफुलकी ताजीतवेली, मस्त वाटल वाचुन.

  -अजय

  ReplyDelete
 3. kharech जीवाभावाच्या माणसांशी संवाद हरवून बसलोय़ !

  chhan kavita....

  ReplyDelete
 4. जीवाभावांच्या माणसांशी संवाद हरवून बसलोय अगदी बरोबर आहे... लै भारी! मनापासून आवडली ..................

  ReplyDelete