Wednesday, August 18, 2010

श्रावण..!


उन्हे उलटता, सांजवेळी
श्रावण ओल्या घनात
दाटून आले आभाळ सारे
पावसाच्या काय मनात


रिमझिम रिमझिम झिरमिरती
इवलेइवले तुषार
हळूच मागून खोडी काढी
वारा किती हुशार


उघडीप झाली मेघाआडूनी
तळ्यात चमचम बिंब
तिरिप कोवळी पिवळीपिवळी
पानांत टपटप थेंब


श्रावण सा-या चराचरांत
नवचैतन्याचा पूर
अलगद जैसे मनात कोणी
छेडत राही सूर


: अनुराधा म्हापणकर

1 comment:

  1. व्वा सुररेख!

    भा. रा तांबेंची "पिवळे तांबूस उन कोवळे" आठवली.

    ReplyDelete