Thursday, August 19, 2010

एक उसासा फक्त


एक उसासा फक्त

बरंच काही बोलून गेला

किती हळव्या भावनांना

एका श्वासावर तोलून गेला


.

आता शब्दांना काही

बोलणे स्फुरलेच नाही

तरी ते बोलिले बापुडे

अर्थ त्यात उरलेच नाही


.

विरला तो उसासा हवेत

उगा श्वासात बोटे खुपसू नका

पसरले शब्द - भास खोटे

उगा भाव त्यातूनी उपसू नका


.

सारे आता शांत संथ

श्वासांनाही साधलेली लय आहे

शब्द आणि श्वास… !

त्यांची रोजचीच ही सवय आहे


.

अनुराधा म्हापणकर


1 comment:

  1. खूप सुंदर लिहिल्यात भावना तुम्ही.... अगदी मनाला स्पर्शून जातात.....

    ReplyDelete