Monday, June 18, 2012

आता उगा कशाला हा पूर आसवाचा
तो पदर रेशमाचा जेव्हा भिजून गेला


घटिका जगावयाची उरलीच नाही हाती
क्षण थांबले ते सारे, केव्हा थिजून गेला


चाले कशास आता हे श्वास मोजणे की
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला


शृंगार साज तेव्हा वायाची गेले सारे
चेहरा कलेवराचा फुका सजून गेला


ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
हा देह चंदनाचा जेव्हा झिजून गेला


अनुराधा म्हापणकर

2 comments:

  1. ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
    चंदनाचा देह हा जेव्हा झिजून गेला

    ReplyDelete
  2. चंदनी सुगंधी चिता ही रचली कशाला
    जेव्हा देह हा चंदनाचा झिजून गेला

    येथे "कवितेला" एका वेगळ्या वैचारिकतेतून "चितेची" उपमा दिली आहे...
    तर देहाला चंदनाची...

    ReplyDelete