Wednesday, January 11, 2012
मिळूनही सारं हुकल्यासारखं
कुठं तरी सारं चुकल्यासारखं

सा-या सुखातही - काही दुखणारं
राहून राहून काहीसं रुखरुखणारं

अनाकलनीय गूढ कुठलीशी उणीव
सल काट्याचा - दुखरीशी जाणीव

आता कुठेशी एक वेदना तुटणारी
आर्त मनाची भावना तटतटणारी

सारं सारं असूनही नसलेलं
सर्वकाही जमूनही बिनसलेलं

सुख म्हणावे की आभासाचे वलय हे
कळते ना कळते...गुंतता हृदय हे

2 comments:

 1. एक वर्ष १७ दिवसांची ही अवस संपविल्याकारणे अभिनंदन...

  कविविश्वातले फारसे काही आम्हांस कळत नाही तरी काव्य आपण करीत जावे...

  टीका-टीप्पणी ही कवि मनाचा कस तपासत असतात...

  "जो देखे कवि वो न देखे रवी" असे श्रृतीवचन आहेच...

  असो... शूभेच्छा! पुढील कविता संग्रहाकारणे...

  ReplyDelete
 2. कळते न आकळते... गुंतता हृदय हे हृदय हे
  असे म्हंटले तर अनेक अर्थ समाविष्ट होऊ असतात, जसे कळते अन् आकळते, तसेच कळते पण कळत नाही असे द्वैर्थी...

  ReplyDelete