Friday, June 29, 2012

मेणबत्ती
















तसं पसंत होतं मला
असं मेणबत्ती होऊन जगणं
तसं फारसं होतंच कुठे
माझं आयुष्याकडून मागणं

तुझ्यापुरतं पेटणं
तुझ्यापुरतंच पेटून उठणं

तू..
तू हवं तेव्हा काडी लावलीस
तू..
तू हवं तेव्हा मला पेटवलंस
आणि तुला नको वाटलं  तेव्हा
माझं अस्तित्व तू मिटवलंस

जळताना कळतं होतं
कळताना जळतंही होतं
"मी" ... संपतेय....
"मी" ........... संपतेय ... !!

माझ्या प्रकाशाने तुला उजळवणं
हेच माझं प्राक्तन..
कारण माझा जन्मच मेणबत्तीचा !
.
शेवटी ..
कुणाचे डोळे दिपवून टाकायला
मी सूर्य थोडीच होते ???

वाटलं ते इतकंच..
वा-यावादळाततरी माझ्याभोवती
तुझ्या हातांची ओंजळ धरली असतीस तर !!

अनुराधा म्हापणकर

4 comments:

  1. काही वर्षांनी हा ब्लॉग उघडलाय ! आश्चर्य म्हणजे आजच मेणबत्तीचं मंद जळणं दृष्टीस पडलं ! ...पण तसंच, जसं होतं तसंच !

    इथेही तशीच पोकळी !..२०११ साल पूर्ण कोरडे ! बाराही अर्धे गेले !...चला थोडा तरी आसरा.

    इकडे तर सारेच आटले...नव्हे पार जळून खाक... त्या साठीच ते होते ?

    ReplyDelete
  2. वाटलं ते इतकंच..
    वाऱ्यावादळाततरी माझ्याभोवती
    हातांचा तुझ्या धरिला असतास पसा !!

    ReplyDelete
  3. मेणबत्ती ! स्रीचे आयुष्य तरी कुठे वेगळे आहे !
    पण वि स खांडेकर म्हणतात शब्द आणि अश्रू असमर्थ आहेत जीवनातील वेदना संपवायला ! कृती हवी ! पण ...खूप मोठा पण आहे !

    ReplyDelete