Tuesday, July 24, 2012

सुखाच्या शोधात


कुठे आहे निखळ सुख
कुठे शोधावं त्याचं कारण
नक्की कुठल्या दु:खाला
ठेवावं त्यासाठी तारण
कुठल्या आनंदाचं बांधावं
पापणीच्या दारी तोरण
नक्की कुठल्या भावनेचं
थांबवायला हवं मरण
कुठल्या देवादिकांना जावं
त्या सुखासाठी शरण
कसं आणि कशाने घालावं
वाहत्या आसवाला धरण
कुठल्या रातीच्या स्वप्नांला
वास्तवात मागावं आंदण
कुठल्या आशा अपेक्षेचं
नयनी रेखाटावं कोंदण
कुठेतरी ते नक्कीच आहे
कुठल्यातरी फुलांत, बागडणा-या मुलांत
कुणाच्यातरी जगण्यात, कुणाच्यातरी मानण्यात
आहे ते आहे…
सुख कुठेतरी जवळपास..
नक्कीच आहे सुख कुठेतरी जवळपास..

अनुराधा म्हापणकर

2 comments:

 1. आहे ते आहे…
  सुख कुठेतरी आहे..
  नक्कीच आहे ते कुठेतरी जवळपास..

  असे जरा अंमळ चांगले वाटले मूळ रचनेपेक्षा, पण वाचून आनंदमयमन...

  ReplyDelete
 2. सुखाचा शोध नावाचे पुस्तक आहे २० खांडेकरांचे मागच्या शतकातले...
  अचानक काहीतरी शोधताना सापडले म्हणून सांगितले...

  ReplyDelete