Wednesday, November 7, 2012

रुसलेले शब्द..

हल्ली शब्द रुसलेले असतात
माझ्याशी फारसे बोलत नाहीत

समजतात काय स्वत:ला, म्हणत
एकदा मुसक्या बांधूनच आणलं
आणि एका ओळीत नेऊन ठेवलं
अगदी माझ्या समोरच बसवलं ..
पण ते अति शहाणे..
म्हणाले, कस्सं फसवलं..

मारुन मुटकून आणलंस तरी
आम्ही बोलणार नाही
कवितेत तुझ्या मुळी म्हणजे
मुळीच फुलणार नाही

काय करु तेव्हा पासून मी
शब्दांना शोधत फिरत असते 
भेटले तर त्यांना नक्की सांगा 
त्यांच्यासाठी मी झुरत असते 

2 comments:

  1. हे शब्दगंगे तू मला बाहूत घ्यावे... असे मनोस्मरण नित्य केल्यास सुबाहू फुरफुरून गंगावतरण होऊ शकतो असा आमच्या अढळ विश्वास आहे... हा मनोव्यायाम निश्चितच आहे, पण त्याचा आयाम करून नियमनाने आंतरीक कौल लाभल्यावरच उत्तम लेखन घडते... तत्पुर्वीचे जे सर्व ते हे पूर्व संचिताकडून लाभलेले असते...

    ReplyDelete
  2. शब्दरूपी बहुरूपी अश्व प्रथम शोधायचा, मग त्यावर आरूढ व्हायचे, पश्चात त्याचाच लगाम हातात धरून त्याचे योग्य असे सुकाणू स्वरूपी संचलन म्हणजे नवकाव्याचे उपजणे...

    क्रिया अवघड नक्की आहे, पण तसे सोपे काहीच नसते म्हणून तर आपण, असतो मा सद्गमयः ...

    ReplyDelete