Tuesday, April 15, 2008

ओंजळीतलं आयुष्य..?

एका ओंजळीत आयुष्य घेऊन जगते मी
आणि ओंजळीतून थेंब थेंब गळून जावा
तसं आयुष्यही निसटून जातं क्षणा क्षणाने
किती काही करायचं राहिलय..
आणि कुणास ठाऊक.. अजून किती जगायचं राहिलय..
कसं नेणार तडीस मी - जे मनात कुठेसं योजलय..
किती जगणार मी - विधात्याने तरी अद्याप कुठे मोजलय..
कमी पडतय मला ओंजळीतलं आयुष्य जगायला
रात्रंदिवस असे का माझे भुर्रकन लागले उडायला

ओंजळ कित्ती घट्ट केली
मी मूठही वळून पाहिली
कित्येक दिवसरात्रींची
मग धार होऊन वाहिली

येणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय
ओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय

किती दिवस - आणखी किती वर्षं.. प्रश्न नाही विचारायचा..
असूदेत कितीही.. तमा कशाला..
आता येणारा क्षणन क्षण अगदी कणा-कणाने वेचायचा..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments:

 1. फार सुंदर कविता आहे. आयुष्या बद्दल ची कल्पना फार सुरेख आहे. आपल्याला मझ्यातर्फे ALL THE BEST

  ReplyDelete
 2. Onjalital Aayushy !
  aapan aapal aayushy, swatahun magitalel nasat...
  Vidhatyachya marjimule, aapal astitv asat...
  mag tyat Sukhabarobar Du:khh suddha astach thoadfar...
  *
  Aala divas / Aala kshan bhagyacha asa samajun aayushy jagal, tar te nehmich sunder disat / watat.
  येणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय,
  ओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय.
  ha nishachaych, sukhavanara aahe.
  Gr8!
  Mazya shubhechha, tumachya hya nishchayala........... !

  ReplyDelete
 3. ओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय.
  .
  फार सुंदर.

  ReplyDelete