Saturday, September 6, 2008

एक आस एकुलती..

तू मनांच्या कप्प्यात
तू स्वप्नांत सत्यात
एक बांधलेली वीण
तुझ्यामाझ्या रे नात्यात

तूच श्वास प्राणवायु
हृदयातले स्पंदन
तूच गंध रे कायेचा
तूच चंदन चंदन

तूच प्रिय प्राणसखा
माझ्या प्रीतीचा उच्चार
तुझे आयुष्यात येणे
माझ्या जीवनाचे सार

एक आस एकुलती
तुझ्या रंगात रंगता
मम आयुष्याची ह्वावी
तुझ्या मिठीत सांगता

3 comments:

 1. एक आस एकुलती
  तुझ्या रंगात रंगता
  मम आयुष्याची ह्वावी
  तुझ्या मिठीत सांगता

  waa kyaat baat hai!!!!!!!![:)]

  ReplyDelete
 2. कविता शब्दाशब्दागणिक रंगत जातेय.
  पहिल्या दोन ओळी सोडल्या तर एक भावपूर्ण अष्टाक्षरी आहे ही.
  सगळ्या अमूर्त भावनांची आरास मांडून सांगता मूर्त मीठीत करून सगुण भक्तीचा आलेख लिहीलास जणू.

  (भावहर्षित)
  तुषार

  ReplyDelete
 3. kavita chan ahe
  jamale tar mail liha
  kavitanchi devan ghevan karu

  scape@rediffmail.com

  ReplyDelete