Thursday, January 15, 2009

पिग्गी बँक

.
लहानपणीचा स्टडीटेबलावरचा
तो मातीचा ओबडधोबड पिग्गी..!

पाच पैशापासून रुपयापर्यंत
तळव्यावर पडलेलं कुठलंही..
अगदी कुठलंही नाणं चालायचं
खण्णकन वाजत त्यात ते पडायच
तेव्हा कित्ती आनंद व्हायचा..

ती गच्च भरलेली पिग्गी बँक
तश्शीच आहे अजून टेबलावर
त्यातल्या नाण्यांची खणखणही
त्यात जपलेले आनंदाचे कणकणही

अलिकडेच कधी घेतलेले एफडीज
कितीदा घेतले आणि..
कितीदा मोडले...
गणितच नाही..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments:

  1. अगदी खरं आहे! खूप छान!

    ReplyDelete
  2. Superb !! really heart shaking... am dumbstruck... wid goosebumps on ma arms...

    ReplyDelete
  3. वा...

    “ त्यात जपलेले आनंदाचे कणकणही”
    एकदमच लयबद्धही आणि अर्थयुक्तही.

    ReplyDelete