Friday, May 15, 2009

तुझंही तस्संच

खूप गम्मत वाटते मला
क्षितिजावर टेकलेला सूर्य पहाताना
त्याच्या डोळ्यात थेट डोळे रोखताना

एरव्ही काय बिशाद
नजर उचलून पहायचीही
त्या तेजात नजर मिसळायचीही

पण धरेला स्पर्शताच कसा थंडावतो ना!

तुझंही तस्संच.. त्याच्या सारखं!
एरव्ही झंझावात तू..! पण..
माझ्या परिघात आलास की कसा..
मंद झुळूक होऊन वाहतोस ना..!

3 comments:

 1. मंद झुळूक होऊन वहावयालाच आवडेल मला ! निदान परिघात तर येता येईल ना ?

  ReplyDelete
 2. मला वाटते,असावे अंगणात
  बनूनच झुळूक,यावे वहात

  नको निकट, बिकट वहिवाट!
  राहीन फिरत, तुझ्या परीघात

  सुरेश पेठे

  ReplyDelete