खूप गम्मत वाटते मला
क्षितिजावर टेकलेला सूर्य पहाताना
त्याच्या डोळ्यात थेट डोळे रोखताना
एरव्ही काय बिशाद
नजर उचलून पहायचीही
त्या तेजात नजर मिसळायचीही
पण धरेला स्पर्शताच कसा थंडावतो ना!
तुझंही तस्संच.. त्याच्या सारखं!
एरव्ही झंझावात तू..! पण..
माझ्या परिघात आलास की कसा..
मंद झुळूक होऊन वाहतोस ना..!
Friday, May 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
apratim
ReplyDeleteमंद झुळूक होऊन वहावयालाच आवडेल मला ! निदान परिघात तर येता येईल ना ?
ReplyDeleteमला वाटते,असावे अंगणात
ReplyDeleteबनूनच झुळूक,यावे वहात
नको निकट, बिकट वहिवाट!
राहीन फिरत, तुझ्या परीघात
सुरेश पेठे