Tuesday, March 23, 2010

रोग !

असहाय्य अस्थिर लोकांचे, पसरलेले पुंजके
अशिक्षित खेडवळ कुणी अन, शहाणेही मोजके

गांजलेले व्यापलेले त्यात होते, त्रस्त कोणी
दुर्धर जर्जर व्याधींनी टेकलेले, ग्रस्त कोणी

आहे म्हणे तेथ एक, सिद्धपुरुष महायोगी
लीलया "बाबा"ने त्या निवारले किती रोगी

प्रत्येक गाववेशीवर अशी एखादी आहे रांग
शहरांचं म्हणाल तर वेशीइतकीही नाही लांब

एकविसाव्या शतकातही, अक्कलच गहाण आहे
पादुका म्हणोनी शिरावर, पहा कोणाची वहाण आहे

सायन्स टेक्नोलॊजी जमान्यात, इथे बुद्धीशी वाकडे
आणि (संधी)साधूबाबा ऐकतो, भक्तगणाचे साकडे

निवारेल का कोणी, हाच खरा रोग आहे..
अंधश्रद्धा, देशाचा या अनादिकालीन भोग आहे

सौ. अनुराधा म्हापणकर

9 comments:

  1. माझा अनुभव वेगळं सांगतोय... तेच पुंजके आपले काम होईल त्या बाबाकडे जातात एकाशी गुंतुन रहात नाहीत. आपण शिकले सवरलेले लोक मात्र एकदा एक गुरु केला की त्याचे पाय तो जाईपर्यंत सोडत नाही.. अगदी महाराष्ट्र राज्य लॉटरीसारखे :-)

    ReplyDelete
  2. हो ना शिरिष, शिकले सवरले लोक पाय तर सोडत नाहीच, उलट परिचयातले आणखी त्या पायाशी यावेत म्हणून प्रचार करतात, Multi Level Marketing !

    ReplyDelete
  3. sadyachya jagat lokaana kashta na karta zatpat saglya goshtee havya asatat. tyamulech ashaa babanchya mage lagtat.
    - Guruprasad Karlekar

    ReplyDelete
  4. पण मी असे वल्ली बघितल्यात की जे गुरुंनी स्पष्ट कल्पना दिली "माझे तुला द्यायचे चे दिले आहे" अशी तरी उगाच घुटमळत बसतात. आता आपली लढाई स्वतःच लढायची असते हे ज्यांना कळत नाही त्यांचे काय करायचे? ते खऱ्या अर्थाने त्यांच्या गुरुलाही मागेच खेचत असतात.

    त्यापेक्षा कामापुरता मामा आणि ताकापुरती आज्जी करणारे अशिक्षितच बरे.. असे माझे वैयक्तिक मत... जे शिक्षण माणसाला गति देत नाही त्या शिक्षणाचा काय उपयोग?

    ReplyDelete
  5. Shirish,
    हल्ली न्यूज चैनल्सवर रोज एका नव्या सो कॊल्ड "बाबा"चे बिंग फोडत आहेत. सारं कळत असूनही उघड्या डोळ्यांनी या बाबांना डोक्यावर घेऊन नाचणारे शिकलेसवरलेले लोक पाहून आश्चर्यही वाटते आणि चीडही येते.

    दुर्धर आजारावर डोक्टर न करता "असे" उपाय करणा-यांबद्दल आणि स्व:हस्ते बायको मुलींना या "बाबा"च्या हाती सोपवणा-यांबद्दल तर काय बोलावं ?

    ReplyDelete
  6. हा विषय खूप गहन आहे. मी सदरहू विषयावर अनेक ज्येष्ठांशी चर्चा केली आणि त्यांची साधारण अशीच असलेली मते कालांतराने (चिंतनाने आणि अधिक संशोधनाने) बदललेली पाहिली आहेत... म्हणून इतकेच सांगतो की धुरळा खूप उडाला तरी ज्याने त्याने आपले स्वतःचे मन आपल्याला जेथे योग्य वाटते तेथे ठेवण्याचा प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात असते ... कारण स्वतःवर बेतले की प्रतिक्रिया बदलते बहुतेकांची...

    परिक्षेविण बांधलेले नाणे खोटेच ठरण्याची शक्यता असते असे समर्थवचन आहे... ते जरूर पडताळावे...

    ReplyDelete
  7. शिरीष,

    "परिक्षेविण बांधलेले नाणे खोटेच ठरण्याची शक्यता असते " हे खरं आहे. पण कवी/लेखक हा समाजात घडणा-या घटनांना आपल्या शब्दात नोंदवत असतो. त्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वत: पडताळून पाहणे शक्य नसते.. प्रत्येकाचा दृष्टीकोन प्रत्येक बाबतीत वेगळा असू शकतो. आणि काल व स्थिती परत्वे बदलूही शकतो. परंतु, जे विवेकबुद्धीला त्या क्षणी पटत आहे त्याची ती नोंद तेव्हाच होणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  8. Tumcha kavita apratim aahet evdha mhanun thambnar hoto pan comments varchi tumchi shevatchi pratikriya (March 27, 2010) eka abhijat kavyitrichi ahe asa vatla. Tumcha manapasun kautuk watata. Ashach lihit raha.
    Prasad Govekar.

    ReplyDelete
  9. प्रसाद,
    तुमच्यासारखे रसिक वाचक आहेत म्हणूनच कवितेतल्या ह्या भावना, वेदना तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि तुमचे अभिप्राय एक साध्या कवयित्रीला मोठे करतात.

    धन्यवाद.
    सौ.अनुराधा.

    ReplyDelete