Tuesday, March 24, 2009

नवरा - बायको

.
लग्न होतं तेव्हा
तो असतो नवरा
ती असते नवरी

पावलावर पाऊल
चालतात सप्तपदी
हाती हात धरून
चढतात विवाहवेदी

स्वागत समारंभ
बुके बुफे थाटमाट
पाठवणीचे हुंदके
उंब-यावरचे माप

ज्या क्षणी नवरी
ओलांडून माप येते
तो असतो 'नवरा'च..!
’नवरी’ मात्र बायको होते

कारण
त्याची नवरेशाही मग
आयुष्यभर पुरते
नवरीची नवलाई मात्र
विवाहवेदीवरच सरते

लग्नातल्या ’नव-या’चा रुबाब
संसारातही टिकून राहतो
लग्नातल्या ’नवरी’चा आब
संसारातच पिकून जातो

’नव-या’ची घोडदौड सुरू
’नवरी’चे रास्ता रोको होते
तो असतो 'नवरा'च..!
’नवरी’ मात्र बायको होते


:सौ. अनुराधा म्हापणकर

.
समस्त "बायको" वर्गाकडून एक घोषणा पत्रक :

ही कविता वाचून जे नवरे उत्तर देणार नाहीत
त्यांना ह्यातील मते पटली असे समजण्यात येईल

ही कविता वाचून नुसतेच "नो कमेन्ट्स" म्हणतील
त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे असे मानण्यात येईल

ही कविता वाचून जे वादाला उभे रहातील..!
अर्थात .. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो नाही का ? ह्यांच्या नवरेशाहीलाही असेल..!!

(आता सारे नवरे ग्रीन कॆटेगरीतले असतील नाही..??)

10 comments:

 1. only one side opinion.say another also

  ReplyDelete
 2. तुम्ही मंगला गोडबोलेंचं साहित्य खुप वाचता का हो??

  नाही .. सहज चेष्टा करतोय.. छान जमली आहे कविता..,वाचतांना एका क्षणी वाटलं की शनिवारच्या लोकसत्तामधलं मंगला गोडबोलेंचं आर्टिकल वाचतोय...

  ReplyDelete
 3. changli kavita aahe. ekde marathit kasa lihayacha?
  tumhala jar marathi balgeete kivha marathi angai geetache videos pahayache astil tar majhya blogvar jaroor ya -
  marathichildrenssongs.blogspot.com

  ReplyDelete
 4. हुम्म्म!

  छान!

  ReplyDelete
 5. नवरा हा नवराच राहतो नवरी Hi बायको बनते, कारण काय असावे?
  काहीही असो, छान जमाली आहे कविता.

  ReplyDelete
 6. बरोबर शोधून काढलाय हा नवरी - बायको बदल.

  पण एकतर्फी आणि नुसतेच गृहीत धरलेलं खरं मानून लिहिली आहे बॉ. तरी मस्त आहे अर्थ समजून घेण्यासाठी.

  कुठेतरी इंग्रजीत वाचलेलं आठवतंय....
  after any marriage....
  ... the girl expects the boy to change, but he never changes;
  the boy expects that the girl stays the same, bu she never stays the same.

  हा हा हा.

  ReplyDelete
 7. wha wha khupach mast Anurakha .......

  ReplyDelete
 8. kharach Aahe te!!
  Sonali

  ReplyDelete
 9. नवरा हा नवराच राहतो नवरी व बायकोच बनते.

  ReplyDelete