Saturday, March 7, 2009

क्रिटीकल

ती ही क्रिटीकल
आणि मीही..!

एकच गंभीर आजार
दोघींनाही..!

पण..
मला माहितेय..
मी सर्वाइव्ह होणार..
तिचं मात्र माहीत नाही..

कारण
न परवडणारा
खर्चिक आजार आहे हा

मी विकत घेईन डॉक्टर
आणि प्रत्येक मेडिकल एड

ती मात्र.. कदाचित
एकेका श्वासासाठी
देवाला आळवत राहिल

तिचा आजार महाग
आणि तिचा जीव स्वस्त आहे
माझं मरण मात्र
तिच्या वाटेवर व्यस्त आहे


:सौ. अनुराधा म्हापणकर

7 comments:

 1. स्वतःच्या आजारातही इतरांच्या व्यथेची आणि परिस्थितीची जाणीव व्यक्त होणे हा फार संवेदनशील मनाचा आणि करूणासपन्न मनाचा परिणाम असावा. ही संवेदना अधिक प्रखर झाली तर कदाचित त्या व्यक्तीबद्दल वाटलेली सहानुभूती आपल्याला आणि त्या व्यक्तीलाही पुढे नेण्याची शक्ती देईल.

  अनुराधा करूण लिहिलेस.

  ReplyDelete
 2. Mrs anuradha tai,
  tumachya blog var nusata kavitancha paaus paadnyapekha thoda vichar karun, kalpana ladhavun kavita liha na.. ya kavitechya oli saral lihilyas ekhadya gadyapeksha jast kahi vatanar nahi.. navinya ani kalpana yanchi jodi jamaleli baghayala awadel ...
  maaf kara pan mala matra as vatal mhaun lihile.

  ReplyDelete
 3. http://marathiblogs.net/ या ब्लॉगवरील नवीनतम पोस्ट अवश्य वाचा.
  आपला सहभाग प्रार्थनीय आहे.

  ReplyDelete
 4. अनुराधा, भावना सहजपणे दुसरयापर्यंत पोचवण्याची कला तुला साधलेली आहे. गद्य वाटते, परन्तु आशय अचूक. तुझ्या कविता आवडतात.

  ReplyDelete
 5. Mr. तेजस,
  आपल्या परखड प्रतिक्रियेबद्दल आभार. अशा प्रतिक्रिया दुर्मिळ असतात खरच !

  बर.. कवितेच्या "ह्या" प्रकाराला "मुक्तछन्द" म्हणतात, आणि हा प्रकार खूप प्रचलित आहे.

  "कल्पना आणि नाविन्य"..! हं ..! तुमची ही प्रतिक्रया ह्या कवितेलाचं आहे की तुम्ही ह्या ब्लॉग वरच्या माझ्या मी पाऊस पाडलेल्या इतर कविताही वाचल्या आहेत..? हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

  ReplyDelete
 6. कविता आवडली.ती, आजार या गोष्टी शब्दश: वापरलेल्या नसाव्यात असं वाटतं.त्या पलिकडचं काही सांगायचं असावं?

  ReplyDelete