Thursday, March 5, 2009

ऑनलाइन आहेस?

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हां चाळा होता
ह्या प्रश्नाचं उत्तर
येणार
नाही तरीही
स्क्रैपची
दखल कोणी
घेणार
नाही तरीही
लिहायचं अन् पुसायचं, ऑरकुटचा तो फळा होता

ऑनलाइन आहेस?.... प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
दिसायची होमपेजवर
पुन्हा पुन्हा ती नावे
उत्तर द्यायची पद्धत
नसावी त्यांच्या गावे
माझ्या उत्कंठेचा तरी स्टँमिनाच निराळा होता

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
माझ्याही फळ्यावर काही
अनुत्तरीत प्रश्न थकले
कितीदा तरी स्वहस्तेच
पुसून ते मी टाकले
दोष देण्याचा अधिकार म्हणून मला विरळा होता

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
अंगवळणी पडली रीत
हे जगच आहे व्हर्च्युअल
बोलाचीच नाती सारी
काहीच नसते एक्च्युअल
साक्षात्कार माझा मला झाला किती वेळा होता

तरी.. ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता


: सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment:

  1. वा....

    एकदम मस्त आहे कविता....
    आणि अशी सवय लागली की त्याचं व्यसनच लागतं, माणसाला सामाजिक प्राणी उगाच नाही म्हणत.

    ReplyDelete