Tuesday, November 6, 2007

सॉरी.. राजा..

सॉरी राजा.. माफ़ कर - मी आजही पुन्हा चुकले..
कळले तेव्हा मला जेव्हा - भांडून मी थकले..

रुसू नको रे माझ्यावर.. मी आजही पुन्हा हरले..
घे कवेत विसरुन सारे.. बघ डोळे माझे भरले..

वाटत असेल तुला मी सारखी सारखी का चुकते..
चूका करून..पुन्हा वर कचा कचा का भांडते...

ऐक आता गुपित माझे .. मी आज तुला सांगते..
प्रेमाला लागू नये दृष्ट.. म्हणुन मी पुन्हा पुन्हा भांडते..

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

2 comments:

  1. sunder kavita aani aaplya sakhyala aapan kiti adhure aahot ekmekanshivay yachi parchiti denari hi kavita

    ReplyDelete
  2. प्रेमाला लागू नये दृष्ट.. म्हणुन मी पुन्हा पुन्हा भांडते...
    तरीच!!!!!!!!!!!! बायका का भांडतात हे आज kalale.
    अप्रतिम कविता...

    ReplyDelete