Friday, November 16, 2007

आभाळ फाटून जावं.. !!

उगाच असं आज का वाटे
की तुझ्यासाठी लिहावं
कागदाच्या कायेकर या
शब्दानी तुझ्यासाठी उमटावं..

आज असं काय झाले
मनास वाटे बरसावं
बरसलेल्या 'त्या' क्षणाना
आठवत आठवत तरसावं..

श्रावणातल्या 'त्या' सरीनी
एकटं कधीच नसावं
उन पावसाच्या झिम्म खेळात
मन चिंब चिंब भिजावं ..

ती एकच सर अपुरी
मन अधिकच व्याकुळ व्हावं
घे मिठीत राजा पुन्हा एकदा
आभाळ फाटून जावं.. !!

1 comment:

  1. झकास ... सुरूवातच ईतकी मस्त आहे - "उगाच असं आज का वाटे - की तुझ्यासाठी लिहावं" - थांबावे वाटलेच नाही.

    लिहीत रहा ...

    ReplyDelete