Wednesday, November 19, 2008

गर्ल फ्रेंड..!

.
सहा वर्षांचं पिल्लू माझं
खेळता खेळता मैत्रिणीला घरी घेऊन आला
आजोबा म्हणाले.. कोण रे ही..??
झटक्यात उत्तर..
माझी गर्ल फ्रेंड..!
कित्ती निरागस उत्तर..
’माझी मैत्रिण’ - या शब्दाचं भाषांतर फक्त..!
पण मला हसू आवरता आवरेना..
आणि त्याचं काय चुकलं
त्याला काही कळेना..
त्याच्या मैत्रिणीचा छान गालगुच्चा घेतला..
म्हटलं.. काही नाही रे.. पळा खेळायला..!!
.
.
थोडी वर्षं आहेत अजून
मग पुन्हा म्हणेल.. माझी गर्ल फ्रेंड..!!
.
त्यावेळी सुद्धा असंच हसू यायला हवं..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

3 comments:

 1. 1 Number aahe .. kharach hasu yayala hav...

  ReplyDelete
 2. माझी गर्ल फ्रेंड..!
  कित्ती निरागस उत्तर..
  हो हो निरागासच आहेत हे बोल.
  पण गर्ल फ्रेंड..!! काय नि बॉय फ्रेंड..!! काय , लोकाना फ्रेंड..च अर्थच कळत नाही...

  ReplyDelete
 3. हलकी फुलकी कविता आणि हलक्या फुलक्या भावना ....
  भावना आणि शब्दांचा सुरेख मिलाप आहे कवितेमध्ये

  ReplyDelete