Monday, November 10, 2008

एक पूर्ण वर्तुळ..

.
रशिया चायना.. आफ्रिका..
उत्तर आणि दक्षिण अमेरिका..
भूगोलाचे एकेक नकाशे
पोलपाटावर आकारता साकारता
कधी कंपास लावून गोल करावा
आणि त्रिज्या जुळाव्यात तश्शी
अगदी गोssल पोळी केली पहिली..
आणि मग...
शिकले.. लग्नाची झाले..
सारेच कसे जुळून येत गेले..
.
हल्ली.. माझी लेक..
पोलपाटावर असेच नकाशे काढू लागलीय..
तिला कित्ती म्हणते...
थांब ग राणी..! वेळ आहे ग अजून..!!
तरी.. किती घाई तिला..!!
एक वर्तुळ पूर्ण व्हायला पहातय..!
दुनिया गोल आहे म्हणतात.. म्हणूनच का?
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment:

  1. वाचता वाचता हे समजायला लागलं आहे,
    की खर्‍या कवितेतून कवी नाही बोलत..
    आयुष्यच बोलतं त्याच्यामार्फत

    ReplyDelete