Friday, November 28, 2008

नोंद..!

माहीत नाही कुठे.. पण
होतेय नोंद माझ्या सत्कर्मांची..!

कुठल्याशा वहीत..
होतोय माझा पुण्यसंचय..!

एका अज्ञात पोतडीत
ठेवतंय हिशोब माझ्या जमेचा..
कुणी अकाउंटंट..!

माझ्यातलं माणूसपण
कुणाला तरी कळलंय..!

न विकलेल्या मूल्यांची किंमत
कोणीतरी केलीय..!

म्हणूनच फिरलेय कदाचित माघारी
त्या ठळक होत चाललेल्या सीमारेषेहून..
निर्धोक.. सुरक्षित..!!!


सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments:

 1. स.न.वि.वि.
  आपल्या ब्लाँगर.काँम ला भेट दिली.
  जीवनाच्या विविध पैलूंचे फारच सुंदर काव्य रचले आहे.

  जीवनाचे अंतर
  असे जरी दूर दूर
  परतण्यास घरी
  पावले चालती झर झर

  शुभेच्छा
  दीपक ल. वाईकर

  ReplyDelete
 2. Hi....friend,
  your poems are really mindblowing and direct touch to heart.
  Interesting.....

  ReplyDelete