Tuesday, November 6, 2007

ओर्कुटिंग.. ओर्कुटिंग ..

दिवाळीचे दिवस.. थोडा फराळ बनवीन म्हणते..
लाडू बेसनचे गोल गोल.. चकली तळीन म्हणते..

म्हणत म्हणत मनात मी ऑरकुट लोग़ इन करते..
स्क्रैप वाचून बंद करायचं मनोमन अगदी ठरवते ..

चार रिप्लाय देऊन मी कम्युनीटीवर डोकावाते ..
'मराठी कविता' दिसताच मात्र नजर माझी सोकावते..

नवी कविता.. नवे विषय .. नजर भिरभिर फिरते..
वेळ सरकते पुढे पुढे .. पुन्हा भान माझे हरपते ..

इतकं करूनही भागत नाही.. मग मलाही कविता स्फुरते ..
मराठी टाइपिंग करता करता.. कविता जूनी होउनी मळते ..

चकली चिवडा ..कसलं काय.. सारं मनातच राहून जाते..
ह्या भानगडीत मी रोजचं जेवण..अरे देवा..तेही शिजवले नसते..!!

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

4 comments:

  1. व्वा! अन्नुराधा ताई,
    कविता छान आहेत .
    कविता हे माणसाच एंगेज राहण्याच उत्तम साधन आहे.
    -सचिन पाटील

    प्राजक्ता म्हणते:
    अन्नुराधा ताई,

    आपली माझ करीयर ही कविता आवड्ली.
    करीयर हे प्रत्येकाचचं स्वप्न आहे.
    प्राजक्ता.

    visit us:माझी,कविता व लेख वाचा.
    http:// sachinpatil123.blogspot.com
    and

    माझी पाककला वाचा
    http:// borsepraju.blogspot.com

    धन्यवाद ताई,

    ReplyDelete