Saturday, November 1, 2008

जगण्याचा तो धागा

.
दिवस कस्सा..
धावपळ.. नुसती..
घाईगर्दी.. गडबड नसती..

चिवचिवाट मुलांचा
घरभर पसारा..
युनिफ़ॉर्म.. कज्युअल्स..
कपड्यांचा ढिगारा

रेशन.. प्रोविजन..
ठेवायचा चोख हिशोब सारा
डाळ तांदूळ भाजीपाला
ब्रेकफास्ट जेवणं-रेसिपींचा मारा

फडफडणारे पेपर्स
फ़ाइल वेळेवर करा
मख्ख चेह-याचे आकडे
रिटर्न्स वेळेतच भरा

विस्कटल्या घराची
पुन्हा पुन्हा लावते घडी
पाठ टेकवताना गादीवर
असते अर्धमेली कुडी
.
तुझ्या खांद्यावर मान
शीण सारा जावा सरूनी
विषय वासने पल्याड
असा तुझा स्पर्श संजिवनी

हक्काची एकमेव जगात
ती सिक्युअर्ड आहे जागा
पकडून चालते मी ज्याला
माझ्या जगण्याचा तो धागा
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment:

  1. तुमचा ब्लॉग वाचला. दिवसभराच्या दाग दगीच्या सुद्धा सुरेख कविता होवू शकतात हे पाहून मज़ा आली.

    ReplyDelete